शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

फी वाढ विरोधातील लढा बाजारीकरणाविरुद्ध

By admin | Updated: August 30, 2015 23:00 IST

श्रीधर देशपांडे : आंदोलकांचा विजयी मेळावा संपन्न

नाशिक : शिक्षण संस्थांमधील फी वाढीच्या विरोधात दिला जाणारा लढा हा शिक्षकांच्या विरोधात नाही, तर बाजारीकरणाच्या विरोधात आहे. तथापि, अनेकदा हा लढा शिक्षकांच्या विरोधात असल्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचे मत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केले. सेंट लॉरेन्स शाळेने केलेल्या फी वाढीच्या विरोधात बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी दिलेल्या लढ्याला यश आले असून, शाळने फी वाढ पूर्णत: मागे घेतली आहे. आंदोलनाचा यशाचा विजयी मेळावा नुकताच साजरा करण्यात आला. बाजारीकरण विरोधी मंच आणि सेंट लॉरेन्स पालक संघटना यांच्या वतीने आयोजित विजयी मेळाव्याचा समारोपाप्रसंगी देशपांडे बोलत होते. यामेळाव्याचे प्रमुख अतिथी पुणे येथील डी. वाय. पाटील पालक संघटनेचे संदीप चव्हाण यांनी सेंट लॉरेन्स शाळेतील पालकांच्या लढ्याचे कौतुक केले. यावेळी मंचाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त उपाध्यक्ष छाया देव यांनी नऊ वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. पुुढील कामाची दिशा डॉ. मिलिंद वाघ यांनी मांडली, तर दीनानाथ चौधरी यांनी सेंट लॉरेन्स शाळेतील आंदोलनाची माहिती दिली. यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचा सत्कार मुकुंद दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमती परिहार, अनिता बडगुजर, प्रियांका मोरे, ज्योती अहेर या पालकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार राजेंद्र आव्हाड यांनी मानले. यावेळी अरुण धामणे, वसंत एकबोटे, सचिन मालेगावकर, अजित टक्के, विनायक येवले, प्रभाकर पाटील, किशोर फरांदे, भीमराव महाले, सोनाली चौधरी, श्रीपाद देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.