शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वली पुलाचेही काम रखडल्याने पंधरा गावांचा घोटीशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 22:38 IST

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते काननवाडी फाटा, काननवाडी ते नांदुरवैद्य या रस्त्याचे काम केले असून, काननवाडी ते मुंढेगाव हा रस्ता कामाविना तसाच आहे. त्यामुळे अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असूनही खराब रस्त्यामुळे बससेवा बंद झाल्याने परिसरातील सुमारे दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देगोंदे दुमाला : रस्ता कामे वेळीच पूर्ण न केल्याने ग्रामस्थांची गैरसोय

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते काननवाडी फाटा, काननवाडी ते नांदुरवैद्य या रस्त्याचे काम केले असून, काननवाडी ते मुंढेगाव हा रस्ता कामाविना तसाच आहे. त्यामुळे अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असूनही खराब रस्त्यामुळे बससेवा बंद झाल्याने परिसरातील सुमारे दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे.इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, संबंधित विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनविसेतर्फे अनेकवेळा संबंधित विभागाकडे केली असूनही आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र मतदारसंघात पुन्हा फिरकलेही नाहीत.ओंडओहोळ पुलाचे काम संथगतीनेजानोरी - अस्वली या रस्त्यावरील ओंढओहळ पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथगतीने सुरू असून, या कामाला विलंब का लागला? संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुलाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, परिसरातील दुग्ध व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी आदींना बससेवा बंद झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, अर्धा किलोमीटर अंतरासाठी मुंढेगाव - गोंदेमार्गे १४ किलोमीटरचा वळसा घालून अस्वली येथे यावे लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व इतर संबंधित व्यक्तींवर कारवाई करून काम पूर्ण करून घ्यावे, अशा अनेक विषयांवर नांदगाव बुद्रुक येथील मनसेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, गणेश मुसळे, बाजीराव गायकर, विजय गायकर, रंगनाथ खातळे, समाधान गायकर, योगेश गायकर, दीपक गायकर, संदीप यंदे, आनंदा कर्पे, काका कर्पे, सुभाष मुसळे, शरद मुसळे, वैभव दातीर, किरण बोंबले, किरण तांबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मुंढेगाव - काननवाडी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, अनेकवेळा निवेदन देऊनही संबंधित विभागाने याकडे डोळेझाक केली आहे. याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.- आत्माराम मते, जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे, नाशिक.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRainपाऊस