शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडांचा नाशिक शहरामध्ये वाढता शिरकाव; पोलिसांपुढे नवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:31 IST

नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचा शहरात पुन्हा शिरकाव होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी औषधोपचाराच्या बहाण्याने तर कधी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत तडीपार गुंड शहरात आल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपुर्वी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुंडाला अटक करण्यात आली. यानंतर पुन्हे ...

ठळक मुद्दे गुुन्हे शाखेच्या युनिट-२ने तडीपार संतोष मानेला शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधून अटक ल विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग

नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचा शहरात पुन्हा शिरकाव होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी औषधोपचाराच्या बहाण्याने तर कधी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत तडीपार गुंड शहरात आल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपुर्वी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुंडाला अटक करण्यात आली. यानंतर पुन्हे गुुन्हे शाखेच्या युनिट-२ने तडीपार संतोष मानेला शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधून अटक केली.शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलणारा संशयित आरोपी संतोष बबन माने (रा.दत्तनगर) यास शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे; मात्र काही दिवसांपासून माने हा शहरातच वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मानेच्या मागावर पोलीस होते;मात्र तो त्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने मानेचा माग काढत गुप्त बातमीदाराकडे चौकशी करून माने हा अंबड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वावरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळविली. त्यानुसार पथकाने या भागात पाळत ठेवून सापळा रचला. एक्स्लो पॉइंट चौफूली येथे माने आला असता पोलिसांनी त्यास अटक केली.दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधीर जुने नाशिक परिसरातील कथडा भागात राहणारा समीर उर्फ पप्पी शेख (३०) यालाही पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याने तडीपार आदेशाचा भंग करीत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होऊन औषधोपचार घेत असल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फूटेज तपासून खात्री केली असता पप्पीने उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक दोन दिवसांपुर्वीच अटक केली. एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातून गुंडांना एक व दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केलेले असतानाही ते विविध कारणास्तव शहरामध्येच वावरत असल्याने कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. शहरात वाढती सोनसाखळी, घरफोडी, दुचाकीचोरीच्या घटनांसह तडीपारांचा वावरामुळे ‘गॅँगवार’सारख्या गुन्हयांचाही धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांपुढे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तडीपार सराईत गुन्हेगार तपासून ते शहराबाहेर असल्याबाबत खात्री करण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेNashikनाशिक