शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

By admin | Updated: January 30, 2017 00:42 IST

‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

शफीक शेख : मालेगावअमेरिकेतील कॅलिफोनिर्यातून तब्बल २२ तासांचा प्रवास करून मालेगावी बालकांना पोलिओचे डोस देण्यास नकार देणाऱ्या कुटुंबांचे मतपरिवर्तन करण्यासाठी आलो, त्यात काहीअंशी यशही आले; मात्र उच्चशिक्षित शिक्षकाला पटवूनही त्याने आपल्या मुलास पोलिओचा डोस देण्यास नकार दिल्याने आश्चर्य वाटल्याचे अमेरिकेतील रोटरीयन पथकातील सदस्य स्टीव्ह झेबर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्टीव्ह झेबर म्हणाले, नकारार्थी कुटुंबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी ‘नकार’ कायम ठेवला. वास्तविक शिक्षक असलेल्या मुलाच्या पालकाशी चांगले संभाषण झाले. त्याने समजूनही घेतले. अनेक विषयांवर त्यांच्याशी बोलूनही त्याची ‘भूमिका’ बदलली नाही. झेबर म्हणाले, झेबर म्हणाले, मी रोटरीत रूजू झालो त्यावेळी जगात ३ लाख ५० हजार पोलिओचे रूग्ण होते. गेल्यावर्षी पोलिओचे ३७ रूग्ण होते. सदर शिक्षकाला सांगितले की, संपूर्ण जगात ही पोलिओची ‘लस’ मिळत नाही. मी माझ्या मुलाची ‘रिस्क’ घेतो, असे तो म्हणाला. बाकी इतर लोक सभ्य वाटले. तरीही काही जण आपल्या भूमिकेशी ठाम होते. झेबर यांना समाजकार्यासाठी पत्नीचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. झेबर यांचा मुलगा संगीत शिक्षक आहे तर मुलगी कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये काम करते. भाषेची समस्या त्यांना काही प्रमाणात जाणवली; परंतु स्थानिक रोटेरियन डॉ. दिलीप भावसार यांचे सहकार्य लाभले. सकाळी ९ वाजता मोहिमेवर निघून दीड वाजता परत आलो. मालेगावात मुले आणि पालक यांचे संबंध अतिशय दृढ असल्याचे दिसून आल्याचे सांगत झेबर म्हणाले, पूर्वी मी मुंबई, राजस्थान, उदयपूर येथे येऊन गेलो होतो. दोन कुटुंबांना भेटून तर मला कमालीची भीती वाटल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मी शहरातील भुईकोट किल्ला पाहिला. त्यानंतर यंत्रमाग बघितले. यंत्रमागांच्या ‘घरघर’चा अनुभव वेगळा होता. आम्ही इतक्या लांबून येऊनही लोक त्यांची मानसिकता बदलत नसल्याचे पाहून मन सुन्न झाल्याचे झेबर यांनी शेवटी सांगितले.मालेगावात प्रथमच आले. लोकांनी पाहुण्यासारखं उत्स्फुर्त स्वागतही केल. लहान मुलांना घरोघर जाऊन पोलिओचे डोसही दिले. त्यांच्या पालकांशी चर्चा केली. पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या पाच कुटुंबापैकी चार कुटुंबांचे मन वळविण्यात यश आल्याचे अमेरिकन पथकातील श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले. मार्ग कोल म्हणाल्या, एका घरात मुलाचे वडील नव्हते. बाळाच्या आईने सांगितले. त्यांच्या वडीलांशी चर्चा करून उद्या पोलिओचा डोस मुलाला देईन. मी देखील यंत्रमाग बघितले. विशेष म्हणजे शहरात लोक अतिशय दाटीवाटीने राहत असल्याने आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. काही बुरखाधारी महिला धावत आल्या. त्यांनी मोबाईलवर आमच्याबरोबर फोटोही काढले. २१ वर्षापासून मी ‘रोटरी’त काम करतेय. दक्षिण आफ्रिका, केनिया, टांझानिया, युगांडा, साऊथ आफ्रिका येथे दौरे केले. त्यावेळी मी हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत होते, असे श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले. तामिळनाडूतही कोल येऊन गेल्या असून त्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी निधी मिळविण्याचे काम करतात. आता येथून परतताना वेरूळ, अजिंठा, ताजमहाल पाहून बनारस येथे ‘गंगा’ पाहण्यास जाणार असल्याचे शेवटी श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले.