शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खते तपासणीत अधिकारी ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:54 IST

कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.कृषी आयुक्तांची खरीप हंगाम २०१७ आढावा व रब्बी हंगाम २०१७-१८ नियोजनाबाबत बैठक असून, त्यानिमित्ताने कृषी विभागाने केलेल्या संक्षिप्त माहितीतून हे वास्तव उघड झाल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती कृषी अधिकाºयांना निरीक्षकनिहाय दरमहा खते, बियाणे व कीटकनाशके केंद्रे तपासणीचे लक्ष्य दिलेले असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते विक्री केंद्रांचे २०६८ केंद्रे तपासणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात ९७६ (४७ टक्के) खते विक्री केंद्रांची तपासणी झाल्याचे समजते. तसेच बियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य असताना प्रत्यक्षात ८८५ (५८ टक्के) बियाणे विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याचे कळते. इतकेच नव्हे तर ज्या कीटकनाशके फवारणीवरून रणकंदन सुरू आहे त्या कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८२० कीटकनाशके विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.