शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वाघेरेला दोन बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघेरे येथील पाच आंबे या शेती परिसरात सकाळी शेतकरी तुकाराम भोर हे आपल्या शेतात जात असताना अचानक बांधावर मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याला पाहून भोर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली आणि वनविभागालाही खबर दिली गेली. एक वर्ष वयाची बिबट्या मादी बरगडीपासून पोटापर्यंत फाटलेल्या अवस्थेत मृत आढळून आली. सदर वार्ता पसरताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी खूप मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती माजी सरपंच मोहन भोर यांनी वन विभागाला कळविली असता वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी दत्तू ढोन्नर, वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती तळपाडे, वनरक्षक गाडर, घाटेसाव, सुरेखा आव्हाड, वनमजूर ठोकळ, वाळू आवाली यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.या पाहणीत बिबट्याच्या मानेला जखमा झालेल्या होत्या शिवाय त्याच्या तोंडामध्ये केस आढळून आल्याने दोन बिबट्यांची झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी काढला. मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी घोटी येथे नेण्यात आले आहे.--------------------------------पिंजरा लावण्याची मागणीवाघेरे येथील सदर परिसरात शेतवस्तीवर अनेक शेतकरी राहत असून, रात्री-बेरात्री त्यांची दैनंदिन कामासाठी ये-जा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर या झालेल्या घटनेतील बिबट्या परिसरातच कुठेतरी संचार करत असल्याच्या शक्यतेने परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकºयांनी केली आहे. परिसरात काही शेतकरी दुग्धव्यवसाय तसेच शेळीपालन आदी व्यवसाय करीत असल्यामुळे शेतकºयांमध्ये बिबट्याच्या संचारामुळे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक