शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:17 IST

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या शिक्षण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच पालकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.

इंदिरानगर : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या शिक्षण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच पालकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने कापडी पिशव्यांचेही यावेळी वाटप करण्यात आले.  व्यासपीठावर शल्यचिकित्सक डॉ. सुधीर कुलकर्णी, कवी संतोष हुदलीकर, इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, इंदिरानगर विभाग अध्यक्ष व कार्यक्र माच्या संयोजक राजश्री शौचे, संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष कुमार मुंगी, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, राजन कुलकर्णी, प्रा लक्ष्मीकांत भट, रवींद्र पैठणे, अवधूत कुलकर्णी, प्रमोद मुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर मान्यवरांच्या हस्ते महर्षी याज्ञवलक्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मीरा धारणे यांनी स्वरचित स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.  सूत्रसंचालन ओमकार शौचे यांनी केले. उदय जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास साधना जोशी, प्रेरणा जोशी, उपेंद्र शुक्ल, विनायक पुरोहित, अपर्णा गोहे, प्रिया लावर, रवींद्र भसे, प्रेरणा जोशी, साधना जोशी, सुनीता शुक्ल, उदय जोशी, सी. व्ही. महाजन, दिनेश जोशी, शरद दीक्षित, योगिनी चंद्रात्रे, भरत कुलकर्णी, अनंत काजळे, आत्माराम कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, प्रमोद मुळे, सुहास लेंभे, संजय केळकर, गजानन जाधव, शांता जाधव उपस्थित होते.पुरस्कारार्थींचा गौरववरिष्ठ पोलीस निरीक्षक न्याहाळदे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा. यावेळी बालवाडी ते नववीपर्यंत अभ्यासात व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच विशेष कार्य करणाºया छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रद्धा नालमवार, नारायण न्याहाळदे, महिला पुरोहित स्मिता आपटे, खतनिर्मिती उद्योजक अमित बुडूक, प्राणिमित्र गौरव क्षत्रिय, महारांगोळीकार वीणा गायधनी, आसावरी धर्माधिकारी, ढोलवादक रोहित गायधनी, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे विनायक पुरोहित, राजसारथीचे अध्यक्ष चंद्रकांत बेलगावकर व अश्विनी कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक