नाशिक : भाभानगरच्या नवशक्ती चौकातील स्व. कमळाबाई गिते वाचनालयाच्या नूतन इमारतीचे डॉ. जी. आर. पाटील व राम खैरनार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्पर्धां परिक्षेतील उत्तीर्ण गुणंवत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी भाजपाचे उपाध्यक्ष वसंत गिते होते. वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई नाका युवक मित्रमंडळातर्फे याप्रसंगी स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
स्पर्धां परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 22:28 IST