शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:28 IST

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

ठळक मुद्दे भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले त्यामुळे चांदवड तालुका दुष्काळी असतांनासुध्दा येथील पाझरतलावाला आजही दुष्काळात पाणी आहे ते गावाच्या एकजुटीची व कामाची फलश्रृती असल्याचे प्रतिपादन चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केले. तर बºयाच गावामध्ये दोन तट गट असतात हे मात्र या गावात दिसून येत नाही पाणी फाऊंडेशनचे काम सुरु असतांना बºयाच गावामध्ये जाणाºयाचा योग आला मात्र तेथील नागरीक व तरुण गावातील पारावर बसून असत मात्र त्यांनी श्रमदान केले नाही त्या उलट या गावाने एकी करुन रात्री पहाटे श्रमदान केल्याने हे काम उभे राहु शकले असेही अहेर म्हणाले.राजदेरवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन, भूमिपूजन व जलपूजन तसेच गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नांचा सत्कार सोहळा आमदार डॉ राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, पाणी फाउंडेशनचे हेमंत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विलास ढोमसे, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बाळासाहेब वाघ, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, भारतीय जैन संघटनेचे प्रमोद गोेळेचा, प्रशांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, वनअधिकारी संजय पवार,नांदुरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे , सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता मोरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. मनोहर यशवंते यांनी केले.आभार ग्रामसेवक बी.पी. सोनवणे यांनी मानले.स्वागत नंदराज जाधव, दीपक जाधव, सखुबाई माळी, जगन यशवंते, बापु अहेर, तानाजी शिंदे यांनी केले.तर अनेक जलरत्नांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकांत उपसरपंच मनोज शिंदे यांनी सांगीतले की,धरणाची खोली व माती बांध व इतर कामे केल्याने दुष्काळमुक्त राजदेरवाडी हे होऊ शकले तर आमदार डॉ.अहेर यांनी बरीच विकास कामे या गावाला दिल्याने आम्ही प्रत्येक पुरस्कार जिंकू शकलो . तर राजदेरवाडी किल्ला व परिसरात पर्यटनासाठी शासनाने मदत दिल्यास या आदिवासी गावाचा विकास होऊ शकतो असे शिंदे यांनी सांगीतले . तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राजदेरवाडी किल्ला, कोळधर, इंद्रायणी किल्ला पर्यटन विकासासाठी १७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून येथील नवयुवकांना याचा नक्कीच लाभ होईल असे ते म्हणाले तर पुर्वीच्या काळी फक्त दुधदुभते व खव्यासाठी प्रसिध्द असलेले राजदेरवाडी हे गाव आता कुठे या पाझरतलावामुळे शेती व उद्योगात प्रगती गाठत आहे. जलयुक्तची कामे झाल्यास राजदेरवाडी सारखे इतर गावांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी लवकरच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची या गावाची पाहणी व मेळावा घ्यावा अशी सुचना त्यांनी केली यावेळी नंदराज जाधव, हेमंत पाटील, भुषण कासलीवाल,प्रांत सिध्दार्थ भंडारे, डॉ. नितीन गांगुर्डे यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास विजय धाकराव, वर्धमान पांडे, ज्ञानेश्वर सपकाळे,योगेश ढोमसे, नंदु जोंधळे, साईनाथ कोल्हे, जगदीश कोल्हे, शरद पाटील, अण्णासाहेब शिंदे, नाना जाधव, सुरेश जाधव, भीका जाधव, जगन जाधव, विक्रम जाधव, बाळु जाधव, निवृत्ती जाधव आदिसह राजदेरवाडीचे ग्रामस्थ , अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.