लासलगाव : शालेय दशेतच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली तरच ते भविष्यात उत्तम गुणांनी यश संपादन करून नावलौकिक मिळवू शकतील, असे प्रतिपादन नाफेडचे संचालक व लासलगावचे सरपंच नानासाहेब पाटील यांनी केले.आनंद परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नामकोचे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, लासलगाव मर्चण्टस बॅँकेचे अध्यक्ष डी. के जगताप, कवी प्रा. संदीप देशपांडे, गणेश मंदिर ट्रस्टच्या सचिव सौ. सविता जगताप, प्रा. विजय जैन, प्राचार्य शिवाजीराव मवाळ आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आनंद परिवाराचे संचालक प्रा. दीपक जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी प्रा. संदीप देशपांडे यांनी विद्यार्थी व पालकांच्या नात्यांचे गुंफण करणाऱ्या कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन नूमान शेख यांनी केले. अॅड. तुकाराम जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य मढवई, मुख्याध्यापक शिंदे, मुख्याध्यापक काझी, मुख्याध्यापक देवढे, सुनील ठोंबरे, संजय पाटील, प्रा. कांतीलाल क्षीरसागर, अॅड. सुभाष देशमुख, अनिल वाघ, नानासाहेब सुरवाडे, प्रदीप माठा यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
आनंद परिवारातर्फे गुणवंतांचा सत्कार
By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST