शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:34 IST

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे

ठळक मुद्देटंचाईचे मळभ दूर : पाणीपुरवठा योजनांना जीवदान जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरव्ही डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईची ओरड होऊन ग्रामीण भागात टॅँकरची मागणी केली जात असताना यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा असल्यामुळे टंचाईचे संकट लांबले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्याचा जलसाठा दुपटीने असून, त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यातही फारशी टंचाई भासण्याची शक्यता दिसत नाही.

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे टक्क्याने अधिक बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरडीठाक पडलेली धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. परिणामी नद्या, नाल्यांना महापूर आला. आॅक्टोबर महिन्यात एकाच वेळी जिल्ह्यातील तेरा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने नगर, मराठवाडा, जळगाव जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली तर नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी केली जात, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ८४ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अवघा ४२ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांपर्यंत पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जनतेला केले गेले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेले पाणी व शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अजूनही तुडुंब असल्यामुळे यंदा टॅँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ८२ टक्के पाणी असून, एकट्या गंगापूर धरणामध्ये ७७ टक्के जलसाठा आहे. तर दारणा धरणात ८६ टक्के जलसाठा असून, पालखेडमध्येच कमी म्हणजे ४१ टक्के पाणी आहे. ओझरखेड धरणात ८५ टक्के तर चणकापूरमध्ये ९८, हरणबारीत ८३ व गिरणा धरणात ८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्यामुळे या पाण्यांवर कार्यरत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक