शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

उंच दरीवरून पडल्याने माजी रणजीपटू बुडाल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 23:16 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी रणजीपटू ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते.

घोटी (नाशिक)- माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक सेल्फी घेताना इगतपुरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरातील खोल दरीत पडल्याने खोल पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (१ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून अंंधार पडल्याने शोधकार्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी हे शोधकार्य होणार आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत काही मित्र होते. मानस हॉटेलच्या परिसरात ते आले असता एका खोल दरीच्या ठिकाणी ते सेल्फी काढत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते २५० फूट खोल दरीत कोसळले. याठिकाणी असलेल्या डोहात ते पडले. यासंदर्भात इगतपुरी तहसिल कार्यालय आणि पोलिसांना  माहिती देण्यात आली आहे.

त्यानंतर इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. वाघमारे यांनी तातडीने बचाव पथकाशी संपर्क केला. मात्र, त्यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे शोधकार्य झालेले नाही. त्यामुळे बुधवारी पहाटे हे शोधकार्य सुरू होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.