शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘निपाह’ची भीती; जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:24 IST

केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़

नाशिक : केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़  आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या स्वाइन फ्लू कक्षात संशयित रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉग़जानन होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ त्यामुळे काळजीचे कारण नाही.निपाह विषाणूचा प्रसारया विषाणूचा प्रसार हा मुख्यत्त्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या (फ्रूट बेट्स) मार्फत होतो़ वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो़ डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील याची बाधा होऊ शकते़ १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्त्वे बाधित झाले होते़ निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते़ रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते़ वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो़ याचा कालावधी हा ५ ते १४ दिवस इतका असतो़संशयित  निपाह रुग्णताप, डोके दुखी, झोपाळलेपण, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वराकरिता निगेटिव्ह असणे आणि मागील  तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागातप्रवासाचा इतिहास आहे़  अशा वर्णनाचा कोणत्याही रुग्णास निपाह विषाणू रुग्ण म्हणून गृहीत धरून त्यास विलगीकरण कक्षात भरती करावे तसेच त्याचा  नमुना एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

टॅग्स :hospitalहॉस्पिटल