शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या धास्तीने भाजीपाल्याचे दर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:45 IST

मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.कांद्याच्या दरात देखील सातत्याने घसरण होत असून दर घसरणीमुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजीपाल्यात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजीपाल्यातून उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक केल्याने ग्रामीण भागात खबरदारी म्हणून आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. आठवडे बाजार बंद केल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्रीस कोठे न्यावा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर घरोघरी जाऊन आपला भाजीपाला विकण्याची नामुष्की ओढवली आहे. आठवडे बाजार भरत नसल्याने भाजीपाल्याला मागणी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.दरम्यान ४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाणाऱ्या कांद्याच्या दरात देखील कमालीची घसरण सुरू असून मागील काही दिवसांपासून बाजार समित्यांत कांद्याला प्रति क्विंटल १ हजार पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी