शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धुक्याने वाढवली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:20 IST

बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

पिंपळगाव बसवंत : बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी फवारणी व कीटकनाशकांचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट गडद झाले आहे.पावसामुळे अर्धी पिके नष्ट झाली. त्यात बदलते हवामान व दवबिंदूचे दुसरे संकट ओढवले आहे. धुक्यामुळे द्राक्षासह कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज फवारणी करावी लागत आहे. खर्च वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत मुक्काम ठोकलेल्या पावसाने खरीप हंगामावर अवकृपा केली. या पावसाने हातातोंडाशी आलेली सोयाबीन, टोमॅटो, मका, कांदा आदी पिके सडून गेली. ज्वारी, बाजरी, भात पिकाला कोंब फुटले. या दु:खातून सावरत शेतकºयांनी रब्बी पिके घेतली.मात्र ढगाळ हवामान व धुक्यामुळे तयार द्राक्षमण्यांना तडे जात आहेत. अवकाळीच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच धुक्यामुळे धाकधूक आणखी वाढली आहे. या धुक्यामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी दिवसातून दोन-दोन वेळा बुरशीनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. एका फवारणीसाठी एकरी दीड ते दोन हजार रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे उत्पादन कमी, त्यात खर्चात वाढल्याने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे.डाळिंबाला तेल्याचा धोकाद्राक्षासोबत ४० हजार एकरवरील डाळिंबाच्या बागांना ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. सध्याचे वातावरण तेल्या रोगासाठी पोषक असल्याने शेतकºयांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. आधीच गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना शासकीय मदत मिळालेली नसताना त्यांच्यावर अतिरिक्त फवारणीचा भार पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घटणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे लाल कांद्याच्याही उत्पादनावर ३० टक्क्यांच्या आसपास परिणाम होणार असल्याचा अंदाज कांदा संशोधन विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच रब्बीचा गहू, हरबरा आणि मका या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. तयार झालेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले तर ते द्राक्ष मण्यांच्या दरातसुद्धा जात नाही. यामुळे द्राक्षशेती जोखमीची झाली असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

धुक्यामुळे लाल कांद्याच्या पातीवर करपा येत आहे. त्यावरही फवारणी करण्याची वेळ आली आहे. टमाट्याची पानेही करपून गेली असून, त्यावरही औषधांचा खर्च वाढला आहे. गव्हावरही तांबेरा रोगाची शक्यता बळावली आहे. कोथिंबिर, शेपू वगैरे भाज्यांनाही हे धुके त्रासदायक आहे. पावसामुळे आधीच शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. आता धुक्यामुळे द्राक्षशेतीवर बुरशीजन्य आजारांची शक्यता बळावली असून, दररोज फवारणी करून त्याला आटोक्यात आणणे गरजेचे आहे.- राकेश सोनवणे, कर्मचारी, द्राक्ष कांदा संशोधन केंद्र

पावसाबरोबरच धुके दहीवर यांचाही पीकविम्यात समावेश करावा. बदलत्या हवामानामुळे बागांचे नुकसान होते. त्यामुळे पीकविम्याचा विचार करताना पावसाचाही विचार करायला हवा.- सुनील गवळी, शेती सल्लागार

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे द्राक्ष, डाळिंबासह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता बदललेल्या हवामानाचाही फटका पिकांना बसतो आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.- अक्षय विधाते, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती