शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:25 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाने कामांची गती मंदावली; शेतकऱ्यांत चिंता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आल्यामुळे या हंगामातही बळीराजावर काळजीचे ढग आहेत. दोन हंगामापासून शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे. कारण कोरोनामुळे सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती, वाहतुकीचा अडथळा, बाजार समिती बंद, स्थानिक परिसरातील आठवडे बाजार बंद अशा अनेक संकटांमुळे आपल्या शेतातील मोठ्या कष्टाने व असंख्य स्वरूपाचे भांडवल खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे उत्पन्न कमी व उत्पादन खर्च जास्त हे समीकरण निर्माण झाल्याने आता येणारा खरीप हंगाम कसा घ्यावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रत्येक हंगामात पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जवळचे भांडवल संपल्यामुळे, शेतीसाठी घेतलेले कर्ज अजून फिटले नसताना आता खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे या आर्थिक संकटात सध्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडला आहे.मागील हंगामापासून अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, अस्मानी - सुलतानी संकटे यामुळे शेतकरीवर्ग बेजार असताना त्यात भर पडली ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रब्बी हंगामाचा शेवट कसा तरी केला; पण आता रुग्णसंख्येच्या वाढीमुळे खरीप हंगामाच्या कामासाठी सध्या मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने खरीप हंगामातील कामांची गती मंदावली असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच भागात पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनांवर यांचा विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.खतांच्या वाढत्या किमतीचा फटकासध्या सर्वत्र खरीप हंगामाची सुरुवात होत असताना रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शासनाने जोरदार झटका दिल्याने आता खरीप हंगाम कसा घ्यावा या विवंचनेत तालुक्यातील बळीराजा सापडला आहे.मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाने विक्रमी पातळी गाठली. साधारणपणे मागील वर्षी सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र होते ४५७१.०० व एकूण पेरणी क्षेत्र झाले ६६२३.८५ तर पेरणीची टक्केवारी होती १४४.९१ टक्के. तसेच बाकीच्या पिकांची आकडेवारी याप्रमाणे आहे.पीक हेक्टरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीतृणधान्य १०२८५.६० ९६४१.५५ ९३-७४कडधान्य ४३७५.८० २१९९.७५, ६१-८९अन्नधान्य १४६६१.८० ११८४१.३० ८०-७७गळीतधान्य ८०४५-०० १०६३०-६३ १३२.१४एकूण खरीप क्षेत्र २२७०६.४० २२४७१.९३ ९८.९७या तुलनेत यंदाची उत्पादन पीक टक्केवारी कोरोनामुळे पार होते की नाही यांची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार