शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:45 IST

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे.

ठळक मुद्देउशिरा आवर्तन, बोगस बियाणे, उन्हाच्या तीव्रतेने फटका

जळगाव नेऊर : गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या लाल कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने थोड्याच दिवसात मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळी कांदाही करपा, बोगस बियाणे, उन्हाची तीव्रता यांच्या संकटात सापडला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कारण करपा, बोगस बियाणे, एक महिन्यापासून अतितीव्र उष्णता व येवला तालुक्यात अनेक भागात पालखेड डावा कालव्याचे आवर्तन उशिरा झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची होरपळ झाल्याने शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनात घट येणार आहे.पंधरा दिवसातून येणारे ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह पाऊस, करपा रोग याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर झाला असून मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. उन्हाळी कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होत असून मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अपरिपक्व कांदा, गारपीटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागणार आहे.यावर्षी घरगुती बियाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांनाआला, चालू हंगाम वाया जातो की काय या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीमिळेल त्या भावाने बियाण्याची खरेदी केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यातफसवणूक झाली आहे.लावले उन्हाळ निघाले लाल,डोंगळे, जोडकांदा, सफेद कांदाया पद्धतीने नित्कृष्ट दर्जाचा कांदा निघत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा आहे त्या भावात विक्री करावा लागत असल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहेतर काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी घेतलेले बियाणे लाल कांद्याचेनिघाल्याने देखील अनेकांचे नुकसान झाले.या संकटाबरोबरच एक महिन्यापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. पाण्याची कमतरता भासत असून चार दिवसांआड पाणी द्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी कांदा होरपळ झाली असून त्याचा परिणाम उन्हाळी कांद्यावर होत आहे.फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडी संकटातयावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका खराब झाल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणी बियाणे घेऊन रोपे तयार करत होता. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशिरा झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या. परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान, थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याचा आकार बारीक झाला असून परिपक्वतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मी पाच एकरावर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. घरचे बियाणे संपुष्टात आल्याने बाजारातून बियाणे खरेदी केले. त्यामध्ये ५० टक्के कांदे लाल निघाल्याने व पाहिजे तशी वाढ न झाल्याने कांदा आहे त्या भावात विकावा लागणार आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदा वाढीवर परिणाम झाला असून उत्पादन कमी येणार आहे.- भाऊसाहेब शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती