शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दानाने फेडले पितरांचे ऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:16 IST

नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिकांच्या पितरांचे ऋण फेडण्याचे काम केले आहे.

नाशिक : नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिकांच्या पितरांचे ऋण फेडण्याचे काम केले आहे. पितरांना आपण घरात जेऊ घालतो.मात्र समाजात उपाशी व गरजू अशा गरिबांसाठी मंडळातर्फे दरवर्षी ‘पितरांचा महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गंगापूररोडवरील नृसिंहनगर येथे सकाळपासूनच नागरिकांनी याठिकाणी त्यांच्या पितरांच्या स्मरणार्थ विविध धान्य दान केले. या दानात गहू, तांदूळ, सर्व प्रकारच्या दाळी, गूळ, तूप, तेल तसेच पैशांच्या स्वरूपात दान आले आहे. यावेळी सुमारे ५० क्विंटल धान्य जमा झाले असून, हे धान्य शहरातील ‘दिलासा’ वृद्धाश्रम, ‘पडसाद’ कर्णबधिर मुलांची शाळा, ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ मानसिक अपंग मुलांची शाळा, ‘वात्सल्य’ वृद्धाश्रम, ‘वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय’, ‘गाडगे महाराज आश्रम शाळा’, ‘अंधशाळा प्रशिक्षक संस्था’, विवेकानंद प्रशिक्षण व सेवा कें द्र, पिंपळद या संस्थांना दान आलेले धान्य देण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे १५० जणांनी मंडळाकडे धान्य दान क रत आपल्या पितरांचे ऋण फेडले. कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे बापू कोतवाल, दिलीप कुलकर्णी, मंदार वडगाव, विजय बच्छाव, सुनील आहिरे, सुनील नाखरे आदी उपस्थित होते.आई-वडील व सासू-सासरांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही मंडळाला धान्य दान करत असतो. जमा झालेले धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मंडळाकडून करण्यात येते त्यामुळे हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. आपले जे पूर्वज आहे त्यांना या उपक्रमातून स्मरण केले जाते. त्यामुळे धान्य दान केल्याचे समाधान वाटत आहे.- सुखदा दापोरकर, स्थानिकश्रद्धेसाठी दरवर्षी आम्ही मंडळाकडे धान्य दान करत आहोत. समाजाप्रती एक सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाचे हे कार्य प्रशंसनीय आहे. घरातील पितरांचे कर्म करताना मंडळाकडे वंचित घटकांसाठी धान्याच्या स्वरूपात दान केल्याचे समाधान वाटत आहे.- पराग जवेरी, स्थानिक

टॅग्स :Nashikनाशिक