शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

By admin | Updated: April 12, 2015 00:35 IST

शोकसभा : सर्वपक्षीय शोकसभेत स्व. उत्तमराव ढिकलेंना आदरांजली

नाशिक : राजकारण, समाजकारणात अग्रेसर असलेल्या उत्तमराव ढिकले यांना अपवाद वगळता पराभव पत्करावा लागला. त्यांच्यातील नेतृत्वगुण व माणसे हेरण्याची वृत्ती पाहता, अनेकांना घडविण्यात त्यांचा हात होता, असे सर्वांसाठीच पितृतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली. माजी खासदार उत्तमराव ढिकले यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी रावसाहेब थोरात सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी जवळपास सर्वच वक्त्यांनी स्व. ढिकले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांच्या विविध क्षेत्रात असलेल्या वावरातील अनुभवही कथन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी, ढिकले यांच्या प्रत्येक निवडणूक जिंकण्यामागच्या यशाचे गमक उलगडून दाखविले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही ढिकले यांनी स्वत: दूरध्वनी करून सोसायटीच्या ठरावाबाबत विचारणा करून आपल्यातील जागरूकतेचा परिचय करून दिल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी स्व. ढिकले यांच्याशी महाविद्यालयीन जगतापासून असलेल्या ओळखीचे अनुभव कथन करून, आपल्या अमृतमहोत्सवी समारंभाच्या दिवशीच जिवलग मित्र गेल्याची भावना बोलून दाखविली. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी, ढिकले यांच्या कॉँग्रेसमधील सक्रियतेची ओळख करून देताना विधान सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारा नवनिर्माणचा एकमेव आमदार गमावल्याचे सांगितले. माजी आमदार माणिक कोकाटे यांनीही ढिकले यांच्याशी झालेला परिचय व त्यांच्यामुळेच शिवसेनेत आपला झालेला प्रवेश याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला ढिकले यांच्यात असल्यामुळेच त्यांना कोणत्याही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला नाही असे सांगून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा व त्यांचा पराभव होईल हे त्यांनी अगोदरच हेरले होते म्हणूनच आपण निवडणूक लढविणार नाही असे त्यांनी अगोदरच ठरविले होते, असे सांगितले. बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनीही स्व. ढिकले जसे राजकारणात अग्रेसर होते, तसेच ते निष्णात वकीलही होते. एकदा त्यांनी जिल्हा न्यायालयात दुचाकी लावली असता, त्याला न्यायाधीशांनी हरकत घेऊन दुचाकी काढण्याचे फर्मान सोडले; परंतु ढिकले यांनी त्यांना जुमानले नाही, अशी आठवण सांगितली. यावेळी सहकार, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)