शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुलाचा जीव वाचवताना वडिलांनी गमावले प्राण

By admin | Updated: June 13, 2017 01:30 IST

विजेचा धक्का : सिडकोच्या हनुमान चौकातील दुर्दैवी घटना; लोखंडी जिन्यात प्रवाह उतरल्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क सिडको : विजेचा धक्का लागलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़ ११) सायंकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली़ अनिल बाबूराव भुजबळ (४९) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सिडकोतील हनुमान चौकातील रहिवासी मयत अनिल भुजबळ हे शालेय विद्यार्थी वाहतुकीचे काम करीत.रविवारी सायंकाळपासून सिडको परिसरात पावसाची संततधार सुरू होती़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अनिल भुजबळ व त्यांचा मुलगा अरिहंत या दोघांनी एकत्र जेवण केले. यानंतर घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला अरिहंतने धरले असता त्यास विजेचा झटका बसला़ अनिल भुजबळ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून अरिहंतला बाजूला ओढले. मात्र विजेचा जोरदार झटका त्यांना बसला व ते लोखंडी जिन्यावर फेकले गेले़लोखंडी जिन्यातही विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना भाऊ संतोष यांनी बाजूला केले़ या घटनेची माहिती मिळताच परिसरातील बाळासाहेब गिते, रमेश उघडे, रोहन मोरे, दत्ता वाडेकर, रोहित इंगळे यांसह नागरिकांनी भुजबळ यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.