शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

जत्रा चौफुलीवर जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:59 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने सर्व्हिसरोडने महामार्ग ओलांडणाºया वाहनचालकांची जीवघेणी कसरत सुरू असल्याने या चौफुलीवर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर हॉटेल प्रकाश ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वांत लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला. परंतु पूल उतरल्यानंतर पंचवटीत के. के. वाघ महाविद्यालयाच्या पुढे प्रत्येक चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाचे हॉटेल जत्रापर्यंत विस्तारीकरण करण्यात यावे यासाठी अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केला त्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर करून प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात झाली आहे. या कामासाठी मुख्य रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक वळविण्यात आली असून, समांतर रस्त्याचा अधिकाधिक वापर वाहनचालकांकडून केला जात असला तरी, उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळी संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. शिवाय एकाच बाजूला चारही बाजूने वाहने येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील घडतात. या चौफुलीवर चारही बाजूने वाहतूक सुरू असते शिवाय वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो त्यामुळे रस्ता ओलांडताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ  उडते.या गोंधळात बºयाचदा अपघात घडत आहेत. या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. त्यामुळे या चौफुलीवरील समस्या सोडविण्यासाठी लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.आठवडे बाजारची समस्या गंभीरजत्रा चौफुलीजवळ दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो, पण बहुतांश भाजीविक्रेते सर्व्हिसरोडच्या कडेला आपली दुकाने थाटतात. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बहुतांश वाहतूक सर्व्हिसरोडने सुरू असते, त्यामुळे आठवडे बाजारमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असेपर्यंत विक्रेत्यांना सर्व्हिसरोड ऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.तात्पुरते दुभाजक टाकावेमहामार्गावरील बहुतांश वाहतूक प्रचंड वेगाने सर्व्हिसरोडने सुरू आहे. वाहने ओव्हरटेक करताना समोरून येणाºया दुचाकी व छोट्या वाहनांची तारांबळ उडते. अवजड वाहने थेट अंगावर येण्याची भीती निर्माण होते. शिवाय जत्रा चौफुली येथे तर वाहतूक कोंडीच होते. त्यामुळे सर्व्हिसरोडवर रासबिहारी ते जत्रा चौफुली या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक टाकावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.जत्रा चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या महामार्गाच्या विस्तारीकरनापासूनच पाठ सोडत नाही. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा आहे, पण अजून जवळपास दीड ते दोन वर्षे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना गरजेच्या आहे. त्यामध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक, सर्व्हिसरोडवर दुभाजक टाकावे व सर्व्हिसरोडवर गुरुवारी बसणारा भाजीबाजार, सर्व्हिसरोडचे अतिक्रमण हटवावे जेणेकरून वातुकीला अडथळा होणार नाही.- विजय पेलमहाले, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा