सटाणा:ग्रामसेवकाचा मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्याच्यावर निलंबणाची कार्यवाही करावी या मागणीसाठी तालुक्यातील मळगांव (तिळवण ) ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनाबाई तानाजी पवार व सदस्य म्हाळु रामदास पवार यांनी सोमवार पासुन येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषन सुरू केले आहे.मळगाव (तिळवण) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व्ही.जे. भामरे हे गेल्या दोन वर्षांपासुन कामकाज करतांना आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. असे निवेदनात नमुद केले आहे.दरम्यान दिनेश मोतिराम पिंपळसे यांनी ग्रामपंचायत सदस्य असतांना ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्र मण केले आहे.केलेले अतिक्र म काढण्याबाबत मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेला आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावनी न करता ग्रामसेवक भामरे यांनी त्यांना अभय दिले आहे. याबाबत तात्काळ चौकशी करून ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मळगावच्या सरपंचाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:05 IST
सटाणा:ग्रामसेवकाचा मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्याच्यावर निलंबणाची कार्यवाही करावी या मागणीसाठी तालुक्यातील मळगांव (तिळवण ) ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनाबाई तानाजी पवार व सदस्य म्हाळु रामदास पवार यांनी सोमवार पासुन येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषन सुरू केले आहे.
मळगावच्या सरपंचाचे उपोषण
ठळक मुद्देदिनेश मोतिराम पिंपळसे यांनी ग्रामपंचायत सदस्य असतांना ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्र मण केले आहे.केलेले अतिक्र म काढण्याबाबत मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेला आहे.