शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

रोजंदारी आदिवासी कामगारांचे कुटुंबासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:46 IST

गेल्या अनेक वर्षांपासून अतिदुर्गम भागात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले कर्मचारी रोजंदारीवर आश्रमशाळांमध्ये काम करीत असून, काही कर्मचा-यांची वयाची शासन सेवेची कमाल मर्यादाही ओलांडली आहे.

ठळक मुद्देसेवेत नियमित करा : ‘सेंट्रल किचन’ पद्धतीला विरोधनॉनपेसा कर्मचा-यांना नॉनपेसा क्षेत्रात पदस्थापना देऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रोजंदारीवर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी आदिवासी विकास विभाग रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे. शासनाकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून अतिदुर्गम भागात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले कर्मचारी रोजंदारीवर आश्रमशाळांमध्ये काम करीत असून, काही कर्मचा-यांची वयाची शासन सेवेची कमाल मर्यादाही ओलांडली आहे. या कर्मचा-यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अनेक वेळा पदयात्रा, बि-हाड मोर्चे, सामूहिक आत्मदहन आदी आंदोलने करण्यात आली. त्यावेळी आदिवासी विकास विभागाने आश्वासने दिली परंतु त्याची पूर्तता केली नाही. शासनाने केवळ पेसाअंतर्गत विशेष बाब म्हणून भरतीप्रक्रिया राबविली. या भरतीतील निकषामुळे अनुभवी कर्मचा-यांच्या हाती निराशा पदरी पडली आहे, असे या कर्मचा-यांचे म्हणणे आहे. आदिवासी विकास विभागाने विशेष धोरणात्मक बाब म्हणून या रोजंदारीवरील कर्मचा-यांना सेवेत सामावून घ्यावे तसेच नॉनपेसा क्षेत्रातील रोजंदारी व तासिकावर काम करणा-या कर्मचा-यांचे नियमित सेवेत समायोजन करावे, समायोजन पूर्ण होईपर्यंत या कर्मचा-यांना सेवा सुरक्षा देण्यात यावी, पेसा क्षेत्रातील नियमित नॉनपेसा कर्मचा-यांना नॉनपेसा क्षेत्रात पदस्थापना देऊ नये, विशेष भरतीप्रक्रियेत अपात्र पेसा कर्मचा-यांचेही समायोजन करण्यात यावे, सेंट्रल किचन व बाह्य स्रोताद्वारेची ठेका पद्धत बंद करावी, विशेष बाब भरतीप्रक्रियेतील समकक्ष पदाचा अनुभव ही अन्यायकारक अट रद्द करून कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात महेश पाटील, सचिन वाघ, मनोज जोशी, अण्णासाहेब हुलावले, संतोष कापुरे, फारूक कुरेशी आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिक