शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला सिंगापूरमध्ये ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:00 IST

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला वंध्यत्व निवारण वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल युनायटेड रिसर्च सर्व्हिस - आशिया वन तर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पीटलचे संचालक वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दि. 21 जानेवारी रोजी सिंगापूर येथे पुरस्कार स्विकारला.

ठळक मुद्देनाशिकच्या वैद्यकीय सृष्टीत मानाचा तुरा

नाशिक : येथील प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला वंध्यत्व निवारण वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल युनायटेड रिसर्च सर्व्हिस - आशिया वन तर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पीटलचे संचालक वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दि. 21 जानेवारी रोजी सिंगापूर येथे पुरस्कार स्विकारला. या सन्मानाने ‘प्रोजेनेसिस’ सह नाशिकच्या वैद्यकीय सृष्टीत मानाचा तुरा खोवला गेला आहे.अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर आणि प्रगत उपकरणे यांनी युक्त ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ नि:संतान दाम्पत्यांसाठी वरदान ठरत आहे. ‘प्रोजेनेसिस’चे संचालक आणि प्रसिध्द वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर व डॉ. सोनाली मळगांवकर यांनी नव्या उपचार पध्दतीने मुल न होणार्‍या जोडप्यांच्या जीवनात आशेचा किरण फुलवला आहे. त्याची दखल घेत युनायटेड रिसर्च सर्व्हिस आशिया वन या दुबईस्थित संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वंध्यत्व निवारण, निदान आणि उपचार या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल यापूर्वीही 2016 मध्ये सिंगापूर येथील ‘बीईआरजी’ संस्थेतर्फे ‘बेस्ट हॉस्पीटल फॉर रिप्रोडक्टीव्ह मेडीसीन’ पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्काराने त्याचे कार्य अधिकच अधोरेखीत झाले आहे.आयव्हीएफ (इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इनसेमिनेशन) ही वंध्यत्वावरील वैद्यकीय उपचार पध्दती असून त्याद्वारे अनेक जोडप्यांना अपत्यप्राप्ती शक्य झाली आहे. या पुरस्कारासाठी संस्थेने काही निकष ठेवले होते. त्यामध्ये वंध्यत्वाचे नवीन रूग्ण तसेच पूर्वी हॉस्पीटलमधून उपचार केलेल्या समाधानी रूग्णांची संख्या, हॉस्पीटलमध्ये आयव्हीएफचा सक्सेस रेट, हॉस्पीटलची सर्वंकष आणि सम्यक वृध्दी, प्रगती यासह  रूग्णांची काळजी असे अनेक निकष होते. या सर्व गोष्टींची पूर्तता करत डॉ. नरहरी मळगांवकर संचलित प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने ‘फास्टेट ग्रोईंट ब्रँण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. नरहरी मळगांवकर व डॉ.सोनाली मळगांवकर यांनी आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिकdoctorडॉक्टर