शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

खेड्यांमधील फार्महाउस गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:12 IST

ग्रामीण भागातील फार्महाउसचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावकऱ्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरामधील राजकीय वरदहस्त मिळालेल्या गुंडांचे आश्रयस्थान गावांमधील फार्महाउस बनू लागल्याचे दरी-मातोरीच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुºया कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे यावर नियंत्रण नसल्यानेच गावकु सात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

ग्रामस्थ मेटाकुटीस : पोलिसांचे नियंत्रण नसल्याने फोफावतेय गुन्हेगारीगंगापूर : शहराजवळच्या ग्रामीण भागातील फार्महाउसचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावकऱ्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरामधील राजकीय वरदहस्त मिळालेल्या गुंडांचे आश्रयस्थान गावांमधील फार्महाउस बनू लागल्याचे दरी-मातोरीच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुºया कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे यावर नियंत्रण नसल्यानेच गावकु सात गुन्हेगारी फोफावू लागल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.शहराजवळच असलेल्या गंगापूर, गोवर्धन, चांदशी, दरी, मातोरी, मखमलाबाद, गिरणारे, कश्यपी धरण परिसर, धोंडेगाव, गंगापूर धरण परिसर, महादेवपूर, जलालपूर, सावरगाव, गंगाव्हरे आदी भागात कॉटेज हाउस, फार्म हाउस, हॉटेल्स, रिसॉर्ट, ढाबे उभे राहिले आहेत. यापैकी बहुतांश रिसॉर्टसह फार्महाउसमध्ये अवैध प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे गावकºयांकडून अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले जाते; मात्र नव्याचे नऊ दिवस उलटल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे-थे’ होत असल्याने जणू पोलिसांसाठीदेखील हे अर्थाजनचे साधनच झाले आहे की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. शेतातील घर अशा संकल्पनेतून फार्महाउस साकारले जात असले, तरी निर्जन आणि लोकवस्तीच्या काही अंतर दूर असलेल्या फार्महाउसचा वापर नको त्या कामांसाठी सर्रासपणे केला जात आहे. शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांची, उद्योजकांची, व्यावसायिकांची फार्महाउस आहेत. फार्महाउसच्या दिशेने महिना-दोन महिन्यांतून मोटारींचा ताफा येऊन धडकतो.गुन्हेगार फार्महाउसमध्ये घेतात विश्रांतीपोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी भूमिगत होण्यासाठी गावकुसांमधील ‘बड्या’ फार्महाउसचा आधार घेतात. शहरी भागात जबरी लूट, खून, दरोडे, दंगलीसारखे गंभीर गुन्हे केल्यानंतर अटक टाळण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या पायाशी लोटांगण घालत भूमिगत होण्यासाठी थेट मोठ्या लोकांचे फार्महाउस वशिल्याने मिळवित असल्याची चर्चाही गावांच्या वेशींवर ऐकू येऊ लागली आहे.फार्महाउस की डान्स बार ?शांत, नीरव वातावरण असलेल्या शहराजवळच्या खेड्यांमध्ये फार्महाउसमधून रात्री-बेरात्री अचानकपणे डीजेचा दणदणाट ऐकू येतो. याबाबत गावकरी पोलिसांना माहितीही कळवितात, मात्र कारवाई केवळ फार्स ठरत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. मोठ्या शहरांतील डान्स बारमधील छमछम थेट गावकुसातील फार्महाउसपर्यंत येऊन पोहचल्याचेही गावकºयांनी सांगितले. सर्रासपणे महिला, तरुण-तरुणी चमचम करणाºया मोटारींमधून येत रात्रीच्या वेळी धिंगाणा घालतात यामधूनच गुन्हेगारी वाढीस लागत असल्याचे गावकºयांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी