शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पाथरे परिसरातील शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:42 IST

पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.

ठळक मुद्देम्हणावा तितका पाऊस न पडल्याने परिसरात चिंता व्यक्त

पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.पाथरे परिसरात सुरु वातीस पाऊस बरा पडला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. परंतु आता पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने चालू खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सध्या या भागातील पिके ही करपली आहे. दररोज ढग येत आहेत. परंतू पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच सध्या थंड वारा सुटत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वारेगाव, पाथरे बद्रुक, पाथरे खुर्द परिसरात साधारण १३०० एकर जमीन आहे. या भागात संपूर्ण पेरण्या झाल्या आहेत. शेतकºयांनी सोयाबीन, बाजरी, मका या पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकणी ऊस, डाळिंबाच्या बागा, आहेत परंतु पुरेसा पाऊस नसल्याने ही पिके पाण्यावाचून करपू लागली आहे. पेरणीसाठी शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केला आहे. आता मात्र पीक आणि पैसेही वाया जाणार यात शंका नाही. आता शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा बी- बियाणे खरेदी करावी लागणार आहेत. अगोदरच उसनवारी, कर्ज, पदरमोड करून शेतकर्यांनी पेरणी केली होती. आता पुन्हा हा खर्च पेलणार नसल्याचे दिसते. त्यातच पावसाचे प्रमाण कमी होत आहे. शेतकºयांनी मका, बाजरी पीकांचा विमा काढला आहे. परंतु सोयाबीन पीक परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा विमा मिळत नाही. पर्यायाने भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून आभाळ भरून येत आहे. आभाळ घोंगावत आहे, पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांना पेरणी वाया जाण्याची भीती सतावत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांबरोबर शेत मजुरांचीही अवस्था बिकट झाली आहे. शेतीची कामे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. असेच कायम राहिले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिसरातील जांब नदी, गवळण नदी व नदीवरील बंधार्यांचे खोलीकरण व रु ंदीकरण कामे झाली आहे. परंतु पाऊसच नसल्याने यात पाणी साठा उपलब्द होऊ शकलेला नाही. हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु म्हणावा तितका पाऊस न पडल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.