शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडे बाजार : ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद अवघ्या दोन तासांतच संपतो भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:20 IST

नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे.

ठळक मुद्दे‘शेतकरी आठवडे बाजार’ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध

नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे. अवघ्या दोन अडीच तासांतच बाजार आटोपत असल्याने बाजारात दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे.राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला आहे. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. या संकल्पनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने अवघ्या चौथ्या बाजारातच शेतकºयांचा आठवडे बाजार शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी बाजाराचा अवघा चौथा दिवस होता. मात्र दोन-अडीच तासांतच बाजारातील संपूर्ण भाजीपाला माल विकला जात असल्याचा अनुभव शेतकºयांनी सांगितला. स्वस्त, ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची शेतकºयांच्या आठवडे बाजाराला गर्दी वाढली आहे. येथे केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. या नोंदणीत आता वाढ झाली असून, विक्रेते शेतकºयांची संख्याही वाढली आहे.भरेकºयांचा त्रासव्यापाºयांची मध्यस्थी नसल्याने थेट शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहचला असल्याने शेतमालाला ग्राहकांकडून चांगली मागणी होऊ लागली आहे. आठवडे बाजारात केवळ गट नोंदणीकृत शेतकरीच भाजीपाला विक्री करू शकत असल्याने ग्राहकांना चांगला भाजीपाला मिळू लागला आहे. परंतु या बाजाराला मिळणारा प्रतिसाद पाहून बाजाराच्या बाहेरच्या बाजूला भरेकरी दुकाने मांडू लागल्याने या भरेकºयांना मज्जाव करण्याचे काम पणन तसेच पांजरापोळच्या कर्मचाºयांना करावा लागत आहे. रस्त्यावर बसणाºया भरेकºयांना हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाला तैनात करण्यात आले होते. भरेकरी रस्त्यावरच कचरा करीत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून त्यांना विरोध होत आहे.