शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:08 IST

खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ १९२३ क्विंटल इतकीच मका खरेदी झाली आहे. 

ठळक मुद्देखुल्या बाजारात मक्याला चांगला दर 

नाशिक : खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ १९२३ क्विंटल इतकीच मका खरेदी झाली आहे. जिल्ह्यात हमी भावाने ३० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्रांनी संदेश पाठविलेल्या ५३६ पैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच या खरेदी केंद्रांवर मका विक्री केली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मकाला सरासरी १८०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. तर शासकीय खरेदी केंद्रांवर १८५० रु हमीभावाने मकाची खरेदी केली जात आहे. काही बाजार समित्यांमध्ये काहीवेळी या दरापेक्षा अधिक दर मिळतो. शिवाय पैसेही रोख स्वरुपात मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीस अधिक पसंती देत आहेत. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला जिल्ह्यासाठी देण्यात आलेले ३० हजार क्विंटल खरेदीची उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील महिन्यापासून खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरु होती. या काळात एकूण ६५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५३६ शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी आणावा, असे संदेश पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच माल विक्रीसाठी आणला आहे. १९२३ क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून, २९ लाख ४६ हजार १२५ रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. गहू विक्रीसाठी केवळ येवल्यात १ आणि देवळा येथे ३ अशा एकूण चार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी देवळा येथील खरेदी केंद्रावरून तीन शेतकऱ्यांना गहू विक्रीसाठी आणण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते, पण एकाही शेतकऱ्याने या ठिकाणी गहू विक्रीसाठी आणला नसल्याने अद्याप गव्हाची खरेदीच झालेली नाही.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीGovernmentसरकार