सटाणा : सटाण्याच्या अजमीर सौंदाणे रस्त्यावरील दूधमाळ शिवारात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. यशवंत यादव पवार (६५) असे आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाव असून, त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचे बोलले जात आहे. पवार यांच्यावर जिल्हा बँकेचे साडेसहा लाख व नातेवाइकांकडून हातउसनवार घेतलेले पाच लाख असे साडेअकरा लाखांचे कर्ज होते.शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने ते खचले होते. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असतानाच त्यांनी त्यांच्या शेतातील शेडमध्ये रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्त्या केली. सकाळी पवार कुटुंबीय झोपेतून उठले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)
दूधमाळ शिवारात शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: July 30, 2016 23:38 IST