नाशिकरोड : कर्जाला कंटाळून शिंदे गावातील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़२९) घडली़ नामदेव देवराम झाडे (६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी रविवारी (दि़२८) विषारी औषध सेवन केले होते़शिंदे गावातील शेतकरी नामदेव झाडे यांनी रविवारी विषारी औषध सेवन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी नामदेव झाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (दि. २९) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ नामदेव झाडे याची दीड एकर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज होते़ झाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: May 31, 2017 01:14 IST