सायखेडा : औरंगपूर येथील बाजीराव मार्तंड चिखले (४०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केलीवर्षानुवर्षे दुष्काळ असलेल्या निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील बाजीराव चिखले या तरु ण शेतकºयाने आर्थिक परिस्थितीमुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी आपले जीवन संपविले. रविवारी दुपारी शेतकरी इंधे आपल्या शेतात गेल्यावर त्यांनी शेततळ्यात पाहिले असता चिखले यांचा मृतदेह दिसला. याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अल्पभूधारक असलेले बाजीराव चिखले यांच्यावर भेंडाळी विविध सहकारी सोसायटी आणि विविध दुकानदार, नातेवाईक यांचे तीन लाख ८० हजार रु पये कर्ज होते. सातत्याने शेतातील पीक मातीमोल भावात विक्री होत असल्याने चिखले कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
औरंगपूर येथील शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:40 IST
सायखेडा : औरंगपूर येथील बाजीराव मार्तंड चिखले (४०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली
औरंगपूर येथील शेतकºयाची आत्महत्या
ठळक मुद्देशेततळ्यात उडी मारून आत्महत्याबाजीराव चिखले या तरु ण शेतकºयाने आर्थिक परिस्थितीमुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी आपले जीवन संपविले.