घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी जलपंपाच्या अनोख्या चोरीच्या प्रकारामुळे त्रस्त झाले आहे. या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.इगतपुरी तालुक्यातील धामणी, धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे या भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या पंपाची चोरटे नवीन शक्कल लावून चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धामणगाव येथील राजू गाढवे, रमेश नागरे, जालिंदर कोंडुळे, महादू गाढवे, संतोष वाघचौरे, धर्मा गाढवे, गणपत वाघचौरे, सुखदेव वाघचौरे, भास्कर गाढवे, अशा दहा शेतकऱ्यांचे दारणा नदीपात्रालगत लावलेले कृषिपंपातील ताब्याच्या तारा काढून चोरी होत आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी या वाढत्या चोऱ्यांमुळे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी या त्रस्त शेतकऱ्यांनी पोलिसाकडे केली आहे.
जलपंपाच्या चोरीने शेतकरी त्रस्त
By admin | Updated: August 6, 2014 00:51 IST