शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बाजार समितीच्या वादामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:14 IST

नांदगाव : नांदगाव बाजार समितीने शेतकरीहितार्थ घेतलेला निर्णय व व्यापारी असोसिएशनची नकाराची पहिली घंटा हे जुने दुखणे आहे. मग ते आडत्या व खरेदीदार यांच्यातील संबंधांचा निर्णय असो की समितीच्या वजनकाट्याचा संदर्भ, त्यात वाद-विवाद होणे हे पाचवीलाच पुजलेले असते. त्यामुळे लिलाव बंद, बाजार बंद असे प्रकार उद्भवतात. बाजार समितीने चेक पेमेंटच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन रोखीने पेमेंट द्यावे असा निर्णय घेतला आणि एक आठवड्यापासून लिलाव बंद झाले. यात कोणाचा किती फायदा व तोटा याची गणिते मांडताना शेतकरी या व्यवस्थेतला दुबळा घटक ठरत असतो यात शंका घेण्याचे कारण नाही.

ठळक मुद्दे सभासदांना कर्तव्याची जाणीव करून दिली असंघटित शेतकरी हाच व्यवस्थेतला दुबळा घटक

नांदगाव : नांदगाव बाजार समितीने शेतकरीहितार्थ घेतलेला निर्णय व व्यापारी असोसिएशनची नकाराची पहिली घंटा हे जुने दुखणे आहे. मग ते आडत्या व खरेदीदार यांच्यातील संबंधांचा निर्णय असो की समितीच्या वजनकाट्याचा संदर्भ, त्यात वाद-विवाद होणे हे पाचवीलाच पुजलेले असते. त्यामुळे लिलाव बंद, बाजार बंद असे प्रकार उद्भवतात. बाजार समितीने चेक पेमेंटच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन रोखीने पेमेंट द्यावे असा निर्णय घेतला आणि एक आठवड्यापासून लिलाव बंद झाले. यात कोणाचा किती फायदा व तोटा याची गणिते मांडताना शेतकरी या व्यवस्थेतला दुबळा घटक ठरत असतो यात शंका घेण्याचे कारण नाही.व्यापारीहिताचा निर्णय जोपासण्याचे काम व्यापारी असोसिएशन नेहमीच करत असते व त्यांनी तसे करावे असे सभासदांना वाटत असते. असोसिएशनने हे करत असताना सभासदांना कर्तव्याची जाणीव करून दिली व त्याप्रमाणे कृती केली तर शेतकरी वर्गाचे व व्यापारी वर्गाचे पिढ्यान्पिढ्यांचे भावनिक व आर्थिक नाते तुटणार नाही. काही मोजक्या व्यापारी सभासदांमुळे असोसिएशनला ‘बोल’ लागतो. याची चर्चा खासगीमध्ये व्यापारी करत असतात. मात्र वाईटपणा कोणी घ्यायचा यामुळे असोसिएशनची पंचाईत होते.नोटाबंदीच्या आधी रोखीने व्यवहार सुरू होते. नंतर विवाद निर्माण झाले. त्यावर तोडगा म्हणून आॅनलाइन किंवा चेकने रक्कम अदा करावयाची असे ठरले. आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी बँकांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने व आॅनलाइन पेमेंटसाठी व्यापारी वर्गाकडून सहकार्य मिळत नाही म्हणून धनादेशाचा पर्याय पुढे आला. त्यातून धनादेश न वटणे, नांदगाव शहरात नसलेल्या बाहेरगावच्या बँकांचे धनादेश देणे व त्यामुळे महिना- दीड महिना पेमेंट खात्यावर जमा न होणे अशा अनेक भानगडी तयार झाल्याने शेतकºयांची अडवणूक होऊ लागली व नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने व्यापाºयानी रोखीने पेमेंट अदा करावे असा पर्याय काढला. मात्र या निर्णयाला काही व्यापाºयांनी विरोध केला.भांडवल नसताना खरेदी करून मोठी उधारी निर्माण करणाºयांनी येथील मार्केट बिघडवले, अशी दबक्या आवाजातली चर्चा आहे.बाजार समितीच्या निर्णयासोबत शेतकरीशेतकरी बाजार समितीच्या निर्णयाला साथ देण्यास तयार आहेत; पण ते किती काळ थांबतील, असाही प्रश्न आहे. बदलत्या काळाबरोबर संदर्भ बदलत आहेत. गेल्या आठवड्यातल्या घडामोडींवर व्यापारी व शेतकरी यांच्यातले पारंपरिक संबंध कोणते वळण घेत आहे याची चर्चा सुरु झाली आहे. आता सर्वांचीच नवीन पिढी आली आहे. भावनिक जवळीक दूर जात असून, तू तू मै मै कडे वाटचाल होत आहे. धनादेश न वटल्यास रोख पैसे देताना तीन टक्के रक्कम कापून घेतली जाते आणि रोख रक्कम हवी असेल तर ५० रु . कमी भाव पुकारण्याचे धोरण कोणीतरी ठरवणार असेल तर या सगळ्यात असंघटित शेतकरी हाच व्यवस्थेतला दुबळा घटक का ठरतो आहे, असा प्रश्न आत्ममग्न करणारा आहे.