शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांनी रूद्रावतार धारण करून शासनाला जाब विचारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 15:33 IST

छगन भुजबळ:येवला कृषी उत्प्पन्न बाजार समितीच्या आवारासहअन्य आवारात विविध विकासकामाचे भूमिपूजन

ठळक मुद्देया कार्यक्र मात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उषाताई शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सन २००३ ते २००८याकाळात सुमारे ४ कोटी ८४ लाख २३ हजार कामे झाली असल्याची माहिती दिली तसेच सन२००३ ते २००८ याकाळात येवला मुख्य बाजार आवारात येवला कार्यालय उत्तर बाजू लिलाव जा

येवला : सर्व पक्षीय नेत्यांनी भीषण पाणी टंचाई,शेतकº्यांवरील संकटे यासाठी एकित्रत प्रयत्न करावे. शेतकº्यांनी आता रु द्रावतार धारण करावा. शासनाला जाब विचारावा, आत्महत्या करून कुटुंबाला अडचणीत न आणता लढवू वृत्तीने संकटाना सामोरे जा. मी त्यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी येथे केले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारासह अंदरसूल व पाटोदा उपबाजार आवारात सुमारे सहा कोटीच्या विविध विकासकामाचे भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.येवला बाजार समितीतर्फेयेवला मुख्य बाजार आवार, पाटोदा आणि अंदरसूल दि.१३ आॅक्टोबर रोजी विविध कामांचे उद्घाटन झाले. आमदार छगन भुजबळम्हणाले,शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समिती शेती आणि शेतकरी हिताची उत्तम प्रकारची कामे करत असल्याचे सांगितले.तालुक्यात दोन आमदार नवीन झाले. अनेक लोक आर्थिक मदत वाटत आहेत सर्वांचे स्वागतच आहे परंतु ज्यांच्या जीवावर राजकारण करायचे आहे तो शेतकरी संकट मुक्त झाला पाहिजे. त्या साठी सर्व पक्षीय नेत्यांनी भीषण पाणी टंचाई,शेतकर्यांवरील संकटे यासाठी एकित्रत प्रयत्न करावे.भुजबळांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. जनतेचे प्रेमाला टाच लावू शकणार नाही. येवला तालुक्याचे माङयावर उपकार आहेत असेही आ.छगन भुजबळ म्हणाले.याशिवाय २०१५ ते २०१८ या काळात येवला मुख्य बाजार आवरता आवारात रस्त्यांची कामे १ कोटी २७ लाख ९४ हजार, भाजीपाला नवीन शेड लिलाव व शेड मधील जागा ड्रीमिक्स कॉन्क्र टीकरण ५७ लाख ८९हजार, स्वच्छता गृह बांधकाम ६ लाख ६४ हजार, भाजीपाला सेल हॉल दुरु स्ती व नवीन पत्रे १३ लाख २२ हजार रु पयांची कामे, अंदरसूल येथे जुन्या आवारात२ प्रवेशद्वाराचे बांधकाम २७ लाख ९१ हजारअंतर्गत रस्ते, व ड्रीमिक्स कॉन्क्र टीकरण ७८ लाख ५६हजार अंदरसूल येथे नवीन जागेत१हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम ५५ लाख ५० हजार रु पये तर उपबाजार पाटोदा येथे रस्ते व ड्रीमिक्स कॉन्क्र टीकरण ६७ लाख ६८ हजार रु पये,१हजार मेट्रिक टन क्षमतेचे २गोदाम बांधकाम खर्च रु पये १ कोटी १२ लाख ८७ हजार रु पयांची कामे झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.जेष्ठनेते माणिकराव शिंदे यांनी स्वागत केले.यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, आमदार किशोर दराडे, राधाकिसन सोनवणे, नम्रता जगताप, दिनेश आव्हाड, सुशील गुजराथी,राजेश पटेल, संभाजी पवार,अनिल कुक्कर,विनिता सोनवणे, गणपत कांदळकर, मोहन शेलार, मकरंद सोनवणे,कैलास व्यापारे, संजय बनकर, नवनाथ काळे, भास्कर कोंढरे, कृष्णराव गुंड, कातीलाल साळवे, अशोक मेंगाणे, संतू पाटील झांबरे, धोंडीराम कदम, पुष्पा शेळके, मनीषा जगताप, राधाबाई गायकवाड, नंदू आट्टल, सुभाष समदडीया,प्रमोद पाटील, गोरख सुरासे, साहेबराव सैद, एकनाथ साताळकर, मंगेश भगत, बाळासाहेब लोखंडे, बी.आर.लोंढे, सचिव कैलास व्यापारे, बंडू आहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव, बाळू गायकवाड आदी उपस्थित होते.==आरोप व काही संचालकांची गैरहजेरी आणि सभापतींचा खुलासाबाजारसमिती उपसभापती गणपत कांदळकर,संजय बनकर,मोहन शेलार,यांचेसह काही संचालक कार्यक्र मास गैरहजर होते.पाटोदा मार्केट मधील व्यापारी संकुलला सर्वांचा विरोध झुगारून स्व.अन्साराम पाचपुते व्यापारी संकुल असे नाव मनमानी करून दिल्याचा आरोप करीत काही संचालक उद्घाटन समारंभाला गैरहजर होते.या पाशर््वभूमीवर,बाजार समितीने खुलासा केला आहे.पाटोदा उपबाजार आवारात व्यापारी संकुलाला स्वर्गीय अन्साराम पाचपुते यांचे नाव देण्यात आले.नाव देण्याचा हा ठराव सर्व संचालकांनी सर्वानुमते मंजूर केला आहे.तत्कालीन संचालक स्वर्गीय पाचपुते यांचे पाटोदा उपबाजार समितीच्या मंजुरीसह जागा देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे.व्यापारी संकुलाला नाव देणेबाबत सभापती मनमानी करतात असे मत काही संचालकाचे असले तरी, मदतीची दखल घेणे ही आपली संस्कृती आहे.अशी मनमानी मला मान्य आहे.व्यापारी संकुलाला स्वर्गीय पाचपुते यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर असतांनाही या मुद्द्यावर काही संचालकांची कार्यक्र माला अनुपिस्थती गैर लागू असल्याची प्रतिक्रि या सभापती उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली आहे.