शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:27 IST

शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली.

नाशिक : शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली.नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने सत्ताधारी भाजपाचे शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या घरासमोर ढोल वाजवून सत्याग्रह आंदोलन केले. आमदारांनी शेतकºयांच्या समस्यांवर विधिमंडळात चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच शेतकºयांच्या समस्या  सोडविण्यासाठी मांडण्यात येणारी विधेयके सादर करण्यासाठी तसेच त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र स्तरावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. दरम्यान, भाजपाच्या तिन्ही आमदारांनी आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.शिवसेनेचे आमदार योगेश घोलप शहरात नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले. शेतकरी आंदोलन समितीने नाशिक जिल्ह्णातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिल्यामुळे गेल्या वर्षी १ जून रोजी झालेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाची तीव्रता पुन्हा एकदा जाणवू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.रविवारी पालकमंत्र्यांना निवेदन देणारशेतक ºयांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्ह्णातील आमदारांना निवेदन दिल्यानंतर रविवारी (दि.२७) जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अशाच प्रकारे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही घरासमोर सत्याग्रह करून निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही भागाचे प्रतिनिधित्व करणारे तथा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनाही मागण्यांचे निवेदन देण्याचे आंदोलन समितीचे नियोजन असून, येत्या १ जूनला नाशिक शहरात गतवर्षाच्या किसान क्रांती मोर्चाच्या शेतकरी संपाची दाहकता जागवणारा मोर्चाही काढण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMLAआमदार