शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:48 IST

अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याचा आरोप

अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.गुजरातच्या कोयली रिफायनरीतून अहमदनगर सोलापूर येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यासाठी इंडियन आॅइल कंपनीतर्फे भूमिगत पाइपलाइन टाकली जात असून, यासाठी शेतकºयांच्या शेतजमिनी भूसंपादन केल्या जात आहे. ७५० किमीच्या पाइपलाइन प्रकल्पासाठी सण १९६२ च्या जमीन वापर हक्काबाबत कलम ६ (१) व ४ (२)अन्वये भूसंपादन करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस काढून मनमाड येथील अधिकाºयांच्या कार्यालयातर्फे हरकत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर येवला येथील तहसील कार्यालयात शेतकºयांना बोलावून मनमानी पद्धतीने अर्ज निकाली काढण्यात येऊन जमिनीचा व शेतमाल नुकसानीचा योग्य दर देऊ असे आश्वासन अधिकाºयांनी दिले होते; मात्र इंडियन आॅइल कर्मचाºयांनी पूर्वसूचना न देता काम सुरू केले. शेतकºयांनी सुपीक जमीन निकामी होणार असल्याने त्या जमिनीचा मोबदला किती, त्या क्षेत्रात असणाºया पिकांचा मोबदला किती व कधी देणार? याविषयी विचारणा केली; मात्र संबंधित अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवला तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.जमिनीचा व असलेल्या पिकाचा दर सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकºयांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. भूसंपादन करताना कृषी अधिकारी, तलाठी सुद्धा सोबत नाही, मालमत्तेचा दर किती व कसा आहे हे कोणत्याच शेतकºयांना माहीत नसताना कर्मचारी चुकीची आकडेवारी सांगून शेतकºयांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. अशा कर्मचाºयांची त्वरित दखल घेऊन शेतकºयांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सूचित करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह अंदरसूल येथील शेतकरी, पुंडलिक जानराव, अनिल वलटे, महादू पुंड, तुळशीराम मेहतर, सदाशिव सोनवणे, रवींद्र बनकर, अरु ण जगताप, राजेंद्र सोनवणे, बोकटेचे उपसरपंच प्रताप दाभाडे आदींनी तहसीलदार रोहिदास वारूळे यांना निवेदन दिले. एकत्र कुटुंबात कलह होण्याची शक्यता१८ मीटर रु ंद व दीड मीटर खोली केल्यास शेतजमिनीतील मुरूम वरती येऊन सुपीक जमीन तीन ते पाच वर्ष नापीक होणार आहे. त्यामुळे या जमिनीत पिकांचे उत्पादन शून्य होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात जमीन वाटपाच्यावेळी या क्षेत्रातून कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय या क्षेत्रात शेतकºयांना घर बांधणे, फळबागा, शेततळे, विहिरी, बोअरवेल घेण्यास शासनाकडून निर्बंध करण्यात आले आहेत.