शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पास जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:52 IST

नांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.

ठळक मुद्देएल्गार : नांदूरवैद्य येथे शेतकºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, कुºहेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, मुकणे आदींसह विविध गावची शेकडो हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या रेल्वे विभागामार्फत मालधक्का, लोकल लाइन, मनमाड-इगतपुरी नवीन रेल्वे लाइन प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली असून, या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे मंगळवारी दुपारी बाधित शेतकºयांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध करण्याची भूमिका घेतली.यावेळी घोटी बाजार समितीचे माजी सभापती राजाराम धोंगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पाडळी देशमुख सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळसाहेब आमले, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, कुºहेगाव सरपंच भाऊसाहेब धोंगडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विक्रम पासलकर, विजय नाठे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पोटी सरकारने कितीही पैसा दिला तरी तो फक्त काही दिवसांचा सोबती असतो म्हणून आपली मायभूमी सहजासहजी बळी पडून सरकारला देऊ नये, असे आवाहन पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केले, तर विक्रम पासलकर, गणेश मुसळे, बाळासाहेब आमले, गणपत दिवटे, वामन काजळे, राजू रोकडे आदींनी जोरदार विरोध करत शेतकºयांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असे सांगितले. प्रास्ताविक संपत मुसळे यांनी केले. आभार दत्तू दिवटे यांनी मानले.या बैठकीस माजी सरपंच मोहन यंदे, संपत मुसळे, पुंडलिक मुसळे, हरिभाऊ गुळवे, दत्तू दिवटे, मोहन करंजकर, बाबू धोंगडे, सुखदेव दिवटे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर धोंगडे, शिवाजी मुसळे, भाऊसाहेब मुसळे, केशव काजळे, बाळासाहेब यंदे, रवि काजळे, नामदेव धोंगडे, भिवाजी धोंगडे आदींसह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांना माहितीने नसल्याने अडचणशेतावर माहिती घेण्यासाठी आलेल्या या कामगारांकडून वरिष्ठ पातळीवर कुठलीही माहिती विचारली असता दिली जात नाही. म्हणून पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज शेतकरी एकत्र आले होते. येत्या गुरु वारी (दि. ६) शेतकºयांचे शिष्टमंडळ खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी यांचीभेट घेणार आहे. या बैठकीत नांदूरवैद्यचे सरपंच अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे यांनी कायदेशीर लढा देऊ, असे सांगितले तर गोंदे दुमाला सरपंच शरद सोनवणे यांनी प्रसंगी मोठा लढा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे म्हटले. कुºहेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांनी खासदार हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे, यांच्याकडे शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊ, असे सांगत शेतकºयांनी संघटित व्हावे, असे सांगितले.