शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:05 IST

शेतकयांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुसºया टप्प्यात रविवारी (दि.२७) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली.

नाशिक : शेतकयांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुसºया टप्प्यात रविवारी (दि.२७) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली.  नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या माध्यमातून विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. परंतु गिरीश महाजन कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर दुपारी आंदोलन समितीने खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्या नाशिक शहरातील निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन करीत त्यांना निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी शेतकºयांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. परंतु, गोडसे कार्यालयात नसल्याने आंदोलकांना सुमारे तासभर गोडसे यांची प्रतीक्षा करावी लागली. गोडसे कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्याची मागणी केली. त्यावर गोडसे यांनी शेतकºयांच्या मागण्या रास्त असून संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी कें द्र स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी सत्याग्रहाचा समारोप केला. या सत्याग्रह आंदोलनात महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती सेना,भारतीय साम्राज्य संघटना, बळीराजा प्रतिष्ठान, मराठा क्र ांती मोर्चाच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेत शेतकºयांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली.१ जूनचा मोर्चा रद्द; हुतात्मांना करणार अभिवादननाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने १ जून रोजी नियोजित केलेल्या मोर्चाला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून राष्ट्रीय किसान महासंघाचा देशव्यापी संप होणार असल्याने मोर्चाच्या निमित्ताने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली. आंदोलन समितीने मोर्चा रद्द केला असला तरी समितीचे प्रतिनिधी हुतात्मा स्मारक ात एकत्र येऊन शेतकरी आंदोलनातील हुतात्मा शेतकºयांना अभिवादन करणार असल्याचेही नाशिक जिल्हा शेतकरी समितीतर्फे सांगण्यात आले आहे.शेतकरी आंदोलनात झिरवाळ सहभागीनाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने २५ मे रोजी जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी दिंडोरीतील शेतकºयांना आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपणही शेतकºयांसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांनीही नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग टाळ मृदुंगाच्या गजरात भजनही केले.टाळ-मृदुंगासोबत इन्कलाब जिंदाबादनाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या प्रतिनिधींनी टाळ मृदुंगाच्या तालावर भगत सिंग तू जिंदा हैं, तू जिंदा हंै, हर एक लहू के कतरे में, इन्कलाब के नारे में, तांडा चाललासारखी विविध स्फूर्ती गीतांचे गायन करून शेतकºयांनी पालकमंत्री आणि खासदारांच्या कार्यालयांसमोर सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून गायकांना साथ देत इन्कलाब जिंदाबादची घोषणा देत शेतकरी एकजुटीचा जयजयकार केला.

टॅग्स :Farmerशेतकरी