शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अभ्यास दौºयावर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:12 IST

रवळजी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौºयाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभ्यास दौºयातील सर्व शेतकरी युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात कसा वापर होऊ लागला यासह संबंधित विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देकळवण । रवळजी ग्रामपंचायतीचा उपक्रम

कळवण : तालुक्यातील रवळजी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौºयाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभ्यास दौºयातील सर्व शेतकरी युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात कसा वापर होऊ लागला यासह संबंधित विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.सन २०१९-२० च्या १४व्या वित्त आयोगामधून २५ टक्के खर्च करण्याची तरतूद आहे. शिक्षण आरोग्य उपजीविका त्यातून हा शेतकरी अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. कळवण तालुक्यातून प्रथमच हा शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असल्याची माहितीदेखील संबंधित अधिकाºयांनी यावेळी दिली. शेतकरी अभ्यास दौºयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पुणे, औरंगाबाद तसेच बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन महोत्सवालादेखील शेतकरीवर्ग उपस्थिती लावणार आहेत. शेतकरी दाºयासाठी भास्कर भालेराव, बबन वाघ, दिपक गांगुर्डे, सुभाष पगार, विनोद भालेराव, भाऊसाहेब बागुल, साहेबराव गांगुर्डे, प्रकाश वाघ, राजेंद्र वाघ, संदिप वाघ, सागर निकम, विजय वाघ, सचिन भालेराव, हिरामण वाघ, अनिलेश जाधव, अजय भालेराव, दिपक जाधव, धनराज कुवर, पप्पु भालेराव, बाबुलाल पालवी, अशोक जगताप आदींची निवड झाली आहे.

कळवण तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी रवळजी ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन गावातील युवक शेतकरी बांधवाना पारंपरिक शेतीऐवजी नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाशी सल्ला मसलत करून अभ्यास दौºयाचे आयोजन करावे.- नितीन पवार, आमदार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती