शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडकीमाळ येथील शेतकरी आवर्तनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:10 IST

मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा ...

ठळक मुद्दे पालखेड:रब्बीहंगामातील पिके करपून जाण्याची भिती

मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना तसेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असुन मानोरी बुद्रुक ( खडकीमाळ ) येथील वितरिका नंबर २५अद्याप आवर्तनाच्या प्रतिक्षेवर आहे. तीन दिवसांपासून वितरिका नंबर२५ ला पाणी सोडले असून बुधवारी ( दि.१९) ला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे पाणी मानोरी ( खडकीमाळ ) येथील शिवारात पोहोचले होते. त्यानंतरकेवळ पाच तासांत चारीचे पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. या वितरिकेला पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह केवळ ०.३० कुसेक्स वेगानेच सोडले असल्याचे शेतकº्यांनी सांगितले. गुरु वारी ( दि.२०) ला सकाळी सात वाजता ग्रामपंचायत सदस्य पोपट शेळके , सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके,देवराम शेळके,संतोष आहेर,राजेंद्र शेळके,दिलीप शेळके,राहुल शेळके,नितीन शेळके,भाऊसाहेब वावधाने, शिवा शेळके,गोरख शेळके,आनंदा शेळके,उत्तम शेळके,गोविंद शेळके श्रावण शेळके,शेखर जगताप आदी खडकीमाळ येथील शेतकºयांनी पालखेड डावा कालव्याच्या अधिकाºयांना वितरिका नंबर २५ चा घडलेला प्रकार लक्षात आणून दिला. या वेळी खडकीमाळ वितरिका नंबर २५ वगळता पाणी हेड पासून तर देशमाने पर्यंत पाणी सुरळीत चालू होते. यावेळी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पालखेड अधिकाº्यांना शेतकºयांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता आमचे अधिकारी आ िणपोलीस यंत्रणा घेऊन आम्ही चारी नंबर २५ च्या हेड वरती येऊन पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास०.२३ इतक्या कमी कुसेक्स ने पाणी सुरू होते.पुढचे पाच ते सात महिने भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. या सात दुष्काळी महिन्यांचे भवितव्य खडकीमाळ शेतकºयांचे पालखेड डावा काळव्यावर अवलंबून आहे. त्यात पाणी येण्याच्या आशा आता धूसर झाल्या आहेत.रब्बीच्या हंगामातील पिके सुद्धा पाण्याअभावी करपून जाणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. खडकीमाळ येथील संपूर्ण परिसर शेत शिवारात असल्याने विहिरीतील पाण्यातील केव्हाच तळ गाठलाआहे.पुढचे पिण्याचे पाण्याचे नियोजन कसे करावे अशी चिंता शेतकº्यांना पडली आहे.त्यानंतर पालखेड कालव्याचा कोणताही अधिकारी मानोरी ( खडकीमाळ ) च्या शेतकº्याकडे पोहचले नसल्याने शेतकº्यांनी पाण्याच्या या नियोजनामुळे दिवसभर चारीच्या हेड वरच ताटकळत ठेवले.पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी शेतकºयांनी महेश पैठणकर ,छगन आहेर ,उपसभापती रु पचंद भागवत , भागवत सोनवणे आदींना वितरिका नंबर २५ ला पाणी सोडण्यासाठी दिवसभर संपर्कात होते.तीन दिवसांपासून वितरिका नंबर २५ ला पाणी सोडलेले असून बुधवारी संध्याकाळ पासून खडकीमाळ येथे ०.२३ कुसेक्स ने पाणी असल्याने कोणत्याही शेतकºयांना या आवर्तनाचा फायदा होत नसून तात्काळ पाण्याचा प्रवाह वाढवून देणेगरजेचे आहे.- संतोष आहेर... सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वच शेतकº्यांना पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे.तरी खडकीमाळ येथे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे".- वैभव भागवत , अभियंता , पालखेड डावा कालवा.