औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता.बागलान ) येथे गुरूवारी सकाळी प्रगतीशील शेतकरी भबुतसिंग सोनु पवार (६८) यांच्यावर शेतात पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला त्यांनी काठीने झुंज दिली. त्यात ते जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी पवार हे सकाळी साडेसात वाजता डाळिंब बाग पाहण्यासाठी शेतात गेले होते. अचानक बिबट्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी काठीने झुंज दिली. बिबट्याने पाठ , व हाताला पंजाने जखमी केले. जवळील शेतकऱ्यांनी आवाज ऐकताच घटनास्थळी नागकिर जमा झाल्यावर बिबट्याने पळ काढला.
बिबट्याच्या हल्लयात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:58 IST