शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:45 IST

चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळीच धाऊन आल्यामुळे सदर शेतकऱ्याचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे रमेश राजोळे हे शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी रात्रीच्यावेळी जात होते. यावेळी अंधारात झाडाझुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांना जबड्यात धरल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात शेतीपिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यामुळे बिबट्याने जबड्यातून राजोळे यांना सोडून पुन्हा झाडाझुडपात धूम ठोकली. राजोळे यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याने त्याची दहशत कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभाकडून शेतकऱ्यांना अपेक्षागोदावरी नदीकाठच्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, रात्रीच्यावेळी मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना रात्री पाणी देणे सोयीचे ठरत आहे. मात्र, रात्रीच्यावेळी बिबट्याचे दर्शन घडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यापुढील काळात वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यात यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या