शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

किसान सन्मान निधी खात्यात जमा अन् परतही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:54 AM

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सिन्नर येथील एका शेतकऱ्याच्या नावावर दुपारी दोन हजार रुपये जमा झाले आणि अवघ्या काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला.केंद्र सरकारने अंदाजपत्रकात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घोषित केली होती आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने घाईघाईने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नाशिक विभागात दहा लाख तर जिल्ह्यात तीन लाख शेतकरी लाभेच्छुक असतील, असे शासकीय सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील विभाग स्तरावर कार्यक्रम झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात या योजनेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते करण्यत आला. त्याचवेळी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रविवारीच (दि. २४) दोन हजार रुपयांचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्णातील अशोक लहागमे यांना दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना काहीसे समाधान वाटले, परंतु ते औट घटकेचे ठरले. दुपारी त्यांच्या खात्यातून सदर रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. परंतु रविवारची सुट्टी असल्याने हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी बॅँकेत जाण्याची सोय नव्हती. सोमवारी (दि. २५) स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सिन्नर येथील शाखेशी संपर्क साधला. त्यावेळी पासबुकमध्येही पैसे जमा झाल्याची आणि काढून घेतल्याची नोंद झाली. परंतु याबाबत काही माहिती नाही. मुंबईत हेड आॅफिसला मेल करा, असे सांगून या शाखेच्या अधिकाºयांनी हात वर केले. त्यामुळे सन्मानधन योजना केवळ शुभारंभापुरतीच होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिकमध्ये अनेक शेतकºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी अल्प शिक्षित किंवा शिकलेले नसल्याने बॅँकेच्या खात्यात मेल करून काय माहिती घेणार, असा प्रश्न लहामगे यांनी उपस्थित केला आहे.शेतकºयांचा हा अपमानकिसान सन्मान अंतर्गत शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग केलेले पैसे परत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर आल्या. ही बाब अत्यंत खेदजनक व शेतकºयांचा अपमान करणारी आहे. साडेचार वर्षांपूर्वी नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सत्ताधाºयांकडून चालविलेल्या घिसाडघाईमुळेच असा गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा तर मिळालाच नाही; मात्र वाट्याला मनस्तापच आला.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा.. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार