शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या समस्येतून शेतकऱ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:13 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागल्याने बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात होती.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागल्याने बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात होती. बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागत. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासक मंडळ व प्रशासनाने नियोजन करून घोटी खंबाळे शिवारात मार्केटचे स्थलांतर केले. या स्थलांतरित आवारात मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक करून शेतकरी व व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला. स्थलांतरित मार्केटचा शुभारंभ आमदार हिरामण खोसकर व मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे यांच्या हस्ते करण्यात आला.गेल्या महिन्याभरापासून घोटी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक वाढल्याने सोयी सुविधांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्याबाबत दखल घेत बाजार समिती प्रशासक मंडळ व प्रशासनाने मार्केट स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार घोटी खंबाळे शिवारातील आश्रमशाळेलगतच्या प्रांगणात आजपासून स्थलांतरित मार्केट भरविण्यास सुरुवात झाले. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीने योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्यात येतील तसेच व्यापारी बांधवांनीही शेतमालाला रास्त भाव देण्याच्या सूचना खोसकर, मुख्य प्रशासक संदीप गुळवे यांनी केल्या. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, प्रशासक मंडळ सदस्य नंदलाल भागडे, तुकाराम वारघडे, नाना गोवर्धने, सुदाम भोर, खंबाळे उपसरपंच दिलीप चौधरी, नारायण चौधरी, सचिव जितेंद्र सांगळे, उपसचिव कातोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक