ब्राह्मणगाव : सध्या बाजारात कांद्याचे व डाळिंबाचेही भाव घसरल्याने आर्थिक व्यवहार मंदावले असून, दसरा सणावर त्याचा परिणाम दिसून आला. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. दिवाळी सण उत्साहात साजरा केला होता. मात्र यंदा त्या उलट परिस्थिती आहे. गारपिटीने कांदा खराब केला, हातातला कांदा कमी भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नवीन खरेदी-विक्रीत व्यवहार ही मंदावले आहेत.
कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात
By admin | Updated: October 6, 2014 23:25 IST