शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबांची होणार राष्ट्रीय पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:36 IST

नियोजन विभाग व सांख्यिकी संचालनालामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी तसेच कर्जे व गुंतवणूक या संदभार्तील ७७ वी राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात येत असून सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे.

नाशिक : नियोजन विभाग व सांख्यिकी संचालनालामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी तसेच कर्जे व गुंतवणूक या संदभार्तील ७७ वी राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात येत असून सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे.सर्वेक्षणात शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्यापासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी होणार खर्च, पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, इत्यादी माहिती ग्रामीण भागात संकलित करण्यात येणार आहे. याचबरोबर ग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबांकडे त्यांनी केलेली गुंतवणूक व त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता व व्यवसायाबाबतची सविस्तर महिती संकलित करण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यात या ऐच्छिक पद्धतीने निवड केलेल्या कुटुंबांना दोन वेळा भेट देऊन विशिष्ट नमुन्यात माहिती संकलित करण्यात येईल. या पाहणीतील निष्कर्षाच्या उपयोग कर्ज विषयक धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जाणार असल्याने सर्वेक्षणासंबंधातील परीपूर्ण व योग्य माहिती देऊन सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय कामास निवड केलेल्या कुटुंबांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिनेश वाघ यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती