शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:35 IST

खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे.

खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे. मे-जून महिन्यामध्ये द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये शेजारील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतिरत होत असतो. परंतु कोरोनामुळे परिसरातून मजुरांचे स्थलांतर खूपच अत्यल्प आहे. तसेच सततच्या पावसामुळे शेतकामे मंदावलेली होती. त्यातच मजुरांचा तुटवडा यामुळे कामांचा वेग मंदावलेला होता. त्यातच शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा निर्यातबंदी केल्याने बाजारपेठा बंद झालेल्या होत्या. त्यातच कोरोनामुळे शेताकामासाठीचे मजूर उपलब्ध होत नसल्याने या हंगामातील शेतीकामांना उशीर झालेला आहे. त्यातच निफाडच्या पूर्व भागात सतत पाऊस सुरू होता. यात पूर्व हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचून राहिल्याने मका, सोयाबीन पिके डोळ्यादेखत सडण्याची भीती निर्माण झालेली होती. त्यामुळे पावसाचा वाढता जोर बघून परिसरातील शेतकऱ्यांना कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांचीही अपेक्षा सोडलेली होती. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस थांबलेला असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा लागलेली आहे. सद्या शेतकऱ्यांना पिकांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारच्या महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी जोरदार ढगफुटीसारखे पाऊस या सततच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागायतदारांना कधी दिवसा तर कधी रात्रीची औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. रात्री पाऊस झाल्यास भल्या पहाटे पडणाऱ्या धुक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू वेलीवर साचतात. त्यामुळे भागातील द्राक्षबागांवर डावण्या, करपा, बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुरशीजन्य रोगाबरोबरच कळी गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत प्रामुख्याने डावण्या रोगाला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक