शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी लागवडीस शेतकऱ्यांची नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

राजापूर परिसर : पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या ...

राजापूर परिसर : पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर तांबट असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, परंतु या पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. दरम्यान, यंदा कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कपाशीला बोंड अळीने उत्पादन व खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्याऐवजी मका पिकाला पसंती दर्शविली आहे.

शेतकऱ्यांनी महागड्या बी-बियाणांची पेरणी केली गेली आहे. राजापूरचा काही भाग हा तसाच पेरणीविना बाकी असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी पेरणी केलेली पिके कोळपणीला आलेली आहेत. शेतकऱ्यांनीही मका पिकाला पसंती दिली आहे तर कपाशीकडे पाठ फिरविली आहे. बऱ्याच ठिकाणी काळ्या रानात शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र ओलीअभावी या काळ्या रानातील पेरणी दुबार होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांनी नशिबावर हवाला ठेवून पेरणी केली त्यांची पिके आता पंधरा दिवसांची झाली असून आता होणाऱ्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत पडणार आहे. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. मृग नक्षत्र संपत आले तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

इन्फो

नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित

कपाशी पिकामुळे शेतात फक्त एकच पीक होते व त्याच शेतात मका लागवड केली तर शेत लवकर रिकामे होऊन तेथे रब्बीच्या हंगामातील पीक घेता येते. राजापूर व परिसरात मागे पाच ते दहा वर्षांपूर्वी शेतकरी कपाशी पिकाकडे वळले होते. पण मागील दोन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व कपाशीचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड क्षेत्रात घट केली आहे. यंदा कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्यानेही शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष वळवले आहे.

कोट.... यंदा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने मका पिकाला पसंती दिली आहे. शेतकरी मका बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या मका पिकाला खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध होतो व उत्पन्न चांगले येते. कपाशी पिकाला औषधावर खर्च जास्त होतो व चारा होत नाही. खर्च जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

- अशपाक सय्यद, कृषी दुकानदार, राजापूर

कोट.... राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. पण मागे सलग दोन वर्षांपासून बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. राजापूर येथे काही पेरण्या झाल्या आहेत तर अजून निम्म्याहून अधिक पेरण्या बाकी आहेत. आधीच्या पेरण्यांची कोळपणी सुरू झाली आहे.

- समाधान आव्हाड, शेतकरी, राजापूर

फोटो- २१ राजापूर क्रॉप

राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.

===Photopath===

210621\561321nsk_10_21062021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.