शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना खासदारांच्या घरासमोर काढणार कंद्याची रंगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:25 IST

नाशिक : देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ २३ सप्टेंबर रोजी खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन करणार असल्य­ाची घोषणा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडवे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत.

या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील सहा महिने ­शेतकº­यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरून निघेल, असे भाव मिळू लागले तर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना वाºयावर सोडणाºया सरकारला अशा पद्धतीने शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. निर्यातबंदीमुळे देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी घालून शेतकº­यांच्या प्रपंचाची राखरांगोळी केली आहे.शेतकºयांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतु शेतकºयांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करून शेतकºयांच्या प्रपंचाची राखरांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी, २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरासमोर, दि. १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून राख करून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेने जाहीर केले आहे.जून महिन्यात केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार कायद्यात दुरुस्ती करून शेतीमाल व्यापार खुला करून कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातून वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंबाही दिला होता; पण तीनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादून शेतकº­यांचा विश्वासघात केला आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.एकूणच देशाच्या व शेतकºयांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा अन्यथा राज्यातील खासदारांच्या घरासमोर आदेशाची राख करून कांद्य­ाची रांगोळी काढण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMember of parliamentखासदार