शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

केळझर धरणातील पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:15 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.

ठळक मुद्दे कृती समितीच्यावतीने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.येथील चारी चे गेल्या पंधरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले चारी नंबर ८ चे काम आज रोजी पूर्ण झालेले आहे. मात्र ज्या केळझर डाव्या कालव्यातून पाणी चारी नंबर आठ ला येणार आहे. तो डावा कालवा काही ठिकाणावर नादुरु स्त असल्यामुळे पाणी येण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. या कालव्यासाठी २०१९ यावर्षी चार कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर होऊन संबंधित ठेकेदाराचे टेंडर ही झाले आहे. ठेकेदार मात्र कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आज पाणी न पोहोचण्याची परिस्थिती उद्भवली आहे. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले असते तर आज रोजी कुठलीही अडचण आली नसती. ठेकेदाराने तात्काळ पाटाची दुरु स्ती करून पाणी कौतिक पाडे पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. आणि संबंधित विभागाने हे काम पूर्ण करून घेतल्यास१८तारखेला कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. केळझर धरणातून वाहून जाणारे पूर पाणी शेतकºयांच्या मळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत शेतकºयांनी अधिकाºयांसमोर मांडले. निवेदनावर सुधाकर रौंदळ, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, गोपीनाथ मोहन, भिका रौंदळ, प्रभाकर रौंदळ, तात्या रौंदळ, लखन पवार, समाधान जाधव, पुंडलिक रौंदळ, मनोज मोरकर, अरु ण मोहन, राजेंद्र जाधव, देवबा मोहन आदींच्या सह्या आहेत.आम्ही शेतकºयांनी चारी नंबर आठ ला कधी पाणी येईल याची अपेक्षा सोडली होती, मात्र कान्हेरी नदीवरील काम पूर्ण झाले आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आज कुठे आमच्या शिवारापर्यंत पाणी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र संबंधित विभागाने कामाकडे लक्ष दिले तर सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.-सुधाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी.केळझर डाव्या कालव्यावर ठिकठिकाणी रिपेरिंग चे काम केले आहे. मात्र उद्यापासून संपूर्ण कालवा साफसफाई करून कौतिक पाडे गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो. उद्यापासून जास्तीत जास्त यंत्रणा उभी करून लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.-ए.बी. रौंदळ,सहाय्यक अभियंता, सटाणा.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी